
महा पोलीस न्यूज | १७ मे २०२४ | जळगाव जिल्ह्याची गुन्हे आढावा बैठक शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव देखील करण्यात आला. खुनाचे दोन गुन्हे उघड केल्याने जळगाव एलसीबी पथकाचा पोलीस अधिक्षकांनी गौरव केला.
जळगाव जिल्हा पोलीस दलाची नियमीत गुन्हे आढावा बैठक शुक्रवार दि.१७ रोजी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस मंगलम हॉलमध्ये पार पडली. प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्यासह सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी, प्रभारी पोलीस अधिकारी उपस्थित होते.
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील राधाबाई भालचंद्र परदेशी वय – ९० यांची हत्या करण्यात आली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच दिवसात गुन्ह्याची उकल करीत मयत वृद्धेचा मुलगा याला अटक केली होती. तसेच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील मांजाबाई दगडू भोई वय – ८० यांची दि.१५ मे रोजी हत्या करण्यात आली होती. एलसीबी पथकाने एकच दिवसात शोध घेत मयत वृद्धेच्या नातूला अटक केली होती.
जिल्ह्यात एकच आठवड्यात झालेले दोन खून उघड केल्याने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते जळगाव एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह संपूर्ण पथकाचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. प्रसंगी जिल्ह्यातील इतर उत्कृष्ट तपास करणारे अधिकारी, कर्मचारी यांचा देखील पोलीस अधिक्षकांनी गौरव केला.
https://www.instagram.com/p/C7FI0vQo4o9/?igsh=MWl2bnR2MnhzdGJyZg==