Social

खिर्डी येथे महावितरण कंपनीचा अजब कारभार ; चक्क दोरीने बांधला इलेक्ट्रिक पोल! 

खिर्डी येथे महावितरण कंपनीचा अजब कारभार ; चक्क दोरीने बांधला इलेक्ट्रिक पोल! 

रावेर/प्रतिनिधी l विनायक जहुरे l तालुक्यातील खिर्डी खु! येथे महावितरण कंपनी ने भर वस्तीत विद्युत प्रवाह असलेल्या इलेक्ट्रिक पोल ला दिला दोरीचा आधार हवेचा किंवा धक्का लागताच नाचू लागतो पोल.

सविस्तर वृत्त असे की गेल्या 15 दिवसापूर्वी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वाऱ्याने रावेर तालुक्यातील खिर्डी खु! येथील बाजार पट्टयातील लिंबाचे झाड पडून विद्युत इलेक्ट्रिक पोल वर पडून तार तुटले जाऊन पोल पूर्णपणे एका बाजूने वाकला गेल्याने त्याला काढून किंवा नवीन पोल न उभारता महावितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांनी अजब शक्कल लढवली चक्क तुटलेल्या झाडाच्या खोडाला दोर बांधून त्याला आधार देण्याचं काम केले.

त्याचबरोबर ज्या ठिकाणी हा पोल उभा आहे तिथे आठवडे बाजार भरत असून बाजूला च वस्ती घरे आहेत लहान मुले, महिला बाहेर अंगणात बसलेले असतात. त्यातच सध्या हवामान विभागाने राज्यात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस व वारा येण्याचे संकेत दिल्याने विद्युत इलेक्ट्रिक पोल पडून मोठी जीवितहानी होऊ शकते. तरी महावितरण कंपनीने अशी दुर्घटना होऊ नये यासाठी त्वरित नवीन पोल उभारून दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील रहिवाशी नागरिकांनी प्रतिनिधी शी बोलतांना दिली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button