शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवून महिलेची ९ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवून महिलेची ९ लाखांची फसवणूक
जळगाव (प्रतिनिधी) :
शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत चोपडा तालुक्यातील एका महिलेला सुमारे ८ लाख ९३ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार १७ ऑक्टोबर २०२४ ते ९ जून २०२५ या कालावधीत घडला असून, याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्मिता अतुल महाजन (वय ४३, रा. चहार्डी, ता. चोपडा) यांच्याशी मोहीत शर्मा आणि आशिष भारद्वाज या नावांनी ओळख दिलेल्या अनोळखी व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी शेअर मार्केटमध्ये सुरुवातीला नफा झाल्याचे दाखवत महिलेला गुंतवणुकीस प्रवृत्त केले. विश्वास संपादन केल्यानंतर अधिकचे उत्पन्न मिळवून देण्याचे सांगून वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी एकूण ८.९३ लाख रुपयांची रक्कम स्वीकारली.
फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर स्मिता महाजन यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.