भडगाव नगरपालिका सर्व प्रभागातील बोगस तसेच वाढीव मतदारांची नावे तात्काळ वगळा

भडगाव नगरपालिका सर्व प्रभागातील बोगस तसेच वाढीव मतदारांची नावे तात्काळ वगळा
मुख्याधिकारी यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांचे निवेदन
भडगाव प्रतिनिधी भडगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी आरक्षण हे काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. यानंतर भडगाव नगर परिषदेच्या संपूर्ण प्रभागातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या व त्यावर हरकतीन साठी आजचा शेवटचा दिवस होता. या संपूर्ण तपासल्या असता त्यामध्ये बोगस मतदार व वाढीव मतदार वाढविले गेले आहे तरी हे बोगस मतदारांच्या आधार कार्ड वरील ऍड्रेस व रेशन कार्ड वरील पत्ता तपासून तत्काळ बोगस मतदार वगळण्यात यावे. असे आशयाचे निवेदन आज म.न.से.चे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, हिरामण बाविस्कर यांनी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना दिले आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,भडगाव नगरपालिकेची आरक्षण जाहीर होऊन मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहे.त्यावर आधारित देखील मागविण्यात आले आहे हरकती मागविण्याचा कार्यकाळ पुरेसा नाही.यात अनेक नावे ही शहरातील व प्रभागातील नसून बाहेर गावातील असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यांचा शोध लागत नाही भडगाव शहरातील काहींनी आपल्या राजकीय फायद्यासाठी बोगस मतदान वाढवलेले आहे. तसेच आपल्या राजकीय फायद्यासाठी इतर प्रभागातील आपले नातेवाईक, मित्रपरिवार,आशांची मते आपल्या वार्डात आणण्यासाठी सदर इच्छुक उमेदवारांनी त्यांचे आधार कार्ड त्यावर सही म्हणजेच त्यांच्या संमतीचे कागदपत्रे आधीच ताब्यात घेतल्यामुळे सदर मतदान तो रहिवास करत असलेल्या ठिकाणी न ठेवता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आपण उभे राहत असलेल्या प्रभागामध्ये हरकती च्या माध्यमातून समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा स्थितीमध्ये योग्यता नसणारे व लोकांची पसंती नसणारे लोकप्रतिनिधी नगरपालिकेत निवडून जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
अशा मतदार घोळामुळे लोकशाहीची हत्या तर होते.पण अकार्यक्षम लोकप्रतिनिधी निवडून आल्यामुळे प्रभागाचा विकासावर त्याचा गंभीर परिणाम होतो. जे या शहराने या आधी भोगले आहे म्हणून सुरू असलेला मतदार यादीचा घोळ आपल्या स्तरावर तात्काळ थांबून प्रत्येक मतदाराला आपण राहत असलेल्या प्रभागामध्ये मध्येच मतदानाचा अधिकार बजावता यावा या साठी मतदाराने दिलेल्या मतदार कार्डवरील पत्त्याचा रहिवाशाचा पंचनामा करून शहानिशा करण्यात यावी. बोगस मतदार असलेल्या मतदारांचे रेशन कार्डची चौकशी करण्यात यावी. योग्य ती चौकशी करून बोगस मतदान वगळण्यात यावे व राजकीय दबावाला किंवा अमिषाला बळी न पडता निवडणुका या पारदर्शक व्हाव्या यासाठी घेण्यात येणाऱ्या हरकती यांची देखील खात्री करून योग्य त्या प्रभागामध्ये मध्ये मतदारांची नावे समाविष्ट करण्यात यावे तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी हरकतींच्या माध्यमातून स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मतदारांची चुकीच्या पद्धतीने फेरफार करत असलेल्या व्यक्तीच्या विरोधात देखील कार्यवाही करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात यावे. जेणेकरून अशा स्वरूपाची वाईट वृत्तीला आळा बसेल.हरकती नंतर नव्याने करण्यात येणारी मतदार यादी ही पुन्हा एकदा जनतेसाठी व उमेदवारांसाठी नव्याने प्रसिद्ध करून त्यावर पुन्हा हरकती मागविण्यात याव्या अशा स्वरूपाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांची स्वाक्षरी आहे यावेळी हिरामण बाविस्कर उपस्थित होते.






