Social

जलतरणातील जळगावचे स्वप्न पूर्ण, जिल्ह्यास मिळाले पहिले राज्यस्तरीय पदक

महा पोलीस न्यूज । दि.२८ ऑगस्ट २०२४ । गेल्या शतकांचे जळगावचे जलतरण खेळातील स्वप्न नुकतेच नेरुळ जिमखाना नवी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पूर्ण झाले. स्पर्धेत जळगाव संघाने कांस्य पदक पटकावले आहे.

नुकतेच नेरुळ जिमखाना नवी मुंबई येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत जिल्हा संघांचे नेतृत्व वैभव सोनवणे याने केले असून 4×100 रिले प्रकारात वैभव सोनवणे, पंकज बाविस्कर, अंकुश तेली व अमोल गोमटे यांच्या संघाने कास्य पदक प्राप्त केले. स्पर्धेकरिता खेळाडूंना एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, जिल्हा संघांचे प्रशिक्षक राहुल सूर्यवंशी मार्गदर्शन यांचे लाभले.

जिल्हा संघाच्या या कामगिरीमुळे भविष्यात जलतरण खेळात जळगांव जिल्ह्यात मोठा वाव निर्माण होईल व नवनवीन खेळाडू पुढे येतील असे मत डॉ. बेलोरकर यांनी व्यक्त केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button