Crime
अमळगाव जळोद रस्त्यादरम्यान भीषण अपघात

अमळनेर | पंकज शेटे – टाटा मॅजिक आणि अपे रिक्षा यांची समोर समोर धडक टाटा मॅजिक गाडी नंबर MH 19 CZ 2522 आणि एपे रिक्षा नंबर MH 19 BJ 4365 यांच्यात जोरदार धडक झाल्याने 2 महिला जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, लवकरच याबाबत पुष्टी करण्यात येईल.
सदरील घटना जळोद – अमळगाव रस्त्यावर मजदूर घेऊन जाणारी ॲपे रिक्षा व समोरून येणाऱ्या टाटा मॅजिक गाडी दरम्यान समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोन महिला जागीच ठार झाल्याचे वृत्त समोर येत आहे, तसेच या भीषण अपघातात अनेक मजूर जखमी झाले असून बाकी जखमी रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटल अमळनेर येथे उपचाराचा साठी घेऊन गेले आहेत.