जामनेर तालुक्यात ट्रॅव्हल्स उलटली, पोलिसांकडून प्रकरणाची दाबादाबी !

महा पोलीस न्यूज । दि.१ जून २०२५ । भुसावळ शहराकडून पुणेकडे जात असलेली ट्रॅव्हल्स जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे उलटल्याची घटना रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, जामनेर पोलिसांकडून प्रकरण दाबले जात असल्याचे दिसून येते.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातून पुणेकडे ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच.१९.सीवाय.२२२४ ही जात होती. गारखेडा गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असताना ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.
2b18076a-31e4-49e4-9ee3-fa337223ca1f
दरम्यान, घटनेबद्दल जामनेर पोलीस निरीक्षक श्री.कासार यांना विचारणा केली असता त्यांना फारशी माहिती नसल्याचे दिसून आले. काही पोलीस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता अपघात किरकोळ असून त्यात कुणीही जखमी नसल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत पोलीस हे प्रकरण दाबत असल्याचे दिसून आले.