Crime

दया नायक यांची एसीपी पदावर पदोन्नती ;  अंडरवर्ल्ड, ड्रग माफियांना घाम फोडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा गौरव

दया नायक यांची एसीपी पदावर पदोन्नती ;  अंडरवर्ल्ड, ड्रग माफियांना घाम फोडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा गौरव

मुंबई (प्रतिनिधी) – अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारी साम्राज्याला हादरवणारे, अनेक एन्काउंटर ऑपरेशन्समध्ये सहभाग घेणारे आणि अंमली पदार्थांच्या जाळ्यावर कडक कारवाई करणारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नायक यांची नुकतीच सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या बढतीचे सर्वत्र स्वागत होत असून, ही बढती म्हणजे त्यांच्या निष्ठावान, निष्कलंक व धाडसी सेवेला मिळालेली योग्य पावती मानली जात आहे.

कर्नाटकातील सामान्य गावातून ते मुंबई पोलिस दलात…

दया नायक यांचा जन्म कर्नाटक राज्यातील करकला तालुक्यातील एन्नेहोल या छोट्याशा गावात झाला. अतिशय साध्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं. 1995 साली त्यांनी मुंबई पोलिस दलात प्रवेश केला आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्यक्षमतेने वेगळी छाप सोडली.

८५ हून अधिक एन्काउंटर  ; गुन्हेगारांचा कर्दनकाळ

1990 च्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीला जेव्हा मुंबई अंडरवर्ल्डने शहराला विळखा घातला होता, तेव्हा दया नायक यांनी एकामागून एक धाडसी कारवाया करत 85 हून अधिक एन्काउंटर केले. त्यांच्या या कारवायांमुळे अनेक कुख्यात गुन्हेगारांचा कायमचा अंत झाला. त्यांच्या नावाने गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली, तर नागरिकांमध्ये विश्वासाचे प्रतिक बनले.

ड्रग्ज माफियांना छप्परफाड धडे ; ठाण्यापासून उपनगरापर्यंत कारवाया

अलीकडच्या काळात दया नायक यांनी मुंबईतील अंमली पदार्थांच्या वाढत्या साखळीला रोखण्यासाठी विशेष मोहिम राबवली. त्यांनी अनेक ड्रग्ज रॅकेट्स उद्ध्वस्त केली, उपनगरात सक्रिय असलेल्या टोळ्यांवर कारवाई केली. त्यांच्या या कामगिरीमुळे राज्यातील पोलिस दलात त्यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button