Other

आनंद हा शोधायचा नसतो, प्रा. डॉ. जतीन मेढे

आनंद हा शोधायचा नसतो, प्रा. डॉ. जतीन मेढे

भुसावळ प्रतिनिधी श्रद्धा आणि कर्म हे सुयोग्य असेल तर नक्कीच जीवन हे आनंदमय होण्यास वेळ लागणार नाही.आता तुम्ही सर्व आनंदयात्री जीवन जगण्याची मजा घेत उर्वरित आयुष्य इतरांना आनंद देण्यात घालवा,असे प्रतिपादन प्रा.डॉ. जतीन मेढे यांनी  भुसावळ येथे केले.

ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित “वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची” मासिक सभा रिंग रोड,भुसावळ या ठिकाणी झाली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रा डॉ. जतीन मेढे, संयोजक डॉ. नितु पाटील,अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, संजय चौधरी,भानुदास पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विश्व प्रार्थना आणि हनुमान चालीसा पठणाने झाली.

” आनंदी जीवन कसे जगावे ” या विषयावर प्रा. डॉ. जतीन मेढे बोलत होते. पुढे ते म्हणाले की आनंद हा तीन प्रकारचा असतो. क्षणिक, समाधान आणि कायम स्वरूपी. कायमस्वरूपी आनंद हा जगण्याची कला तुम्ही आत्मसात करत ही कला तुमच्या नातवंडे यांना पण शिकवा .सुख ही शारीरिक क्षमता असून आनंद ही मानसिक अवस्था आहे.मृत्यूच्या आशेने जगू नका, ते एक अंतिम सत्य आहे. पण त्यातही आनंद पहा. ज्या परमेश्वराने आपल्याला हे सुंदर जीवन दिले त्यांचे सविनय आभार प्रदर्शन करण्याचा तो मार्ग आहे. यावेळी विविध संत,महात्मे,समाज सुधारक यांचे विविध दाखले देत सर्व जेष्ठ नागरिकांना अंतर्मुख केले.

या कार्यक्रमात मोतीराम चौधरी, यशवंत वारके,पंडित पाटील,रेखा चौधरी, मीनाक्षी भोळे, दशरथ राणे,प्रकाश चौधरी, सुहास मुजुमदार यांचे वाढदिवस असल्याने सर्वांना उपरणे आणि पुष्प देत सत्कार करण्यात आला.यावेळी सुरेश बेलसरे ,पुंजो भारंबे, रमण भोगे, प्रमोद बोरोले ,विजया भारंबे, ज्योती चौधरी ,राजाराम चौधरी, मोतीराम चौधरी, चंद्रकांत चौधरी, दिलीप चौधरी, प्रमिला चौधरी, प्रतिभा चौधरी, सोपान चर्हाटे ,लोटू फिरके, अलका इंगळे, सोपान नेमाडे, अशोक नेहेते ,विजया पाटील, वैशाली तुकाराम पाटील, ज्ञानदेव पाटील ,अनिल पाटील, सुलोचना पाटील, प्रकाश पंडित पाटील ,ज्ञानेश्वर पाटील ,इंदू पाटील, विकास राणे, गणेश सरोदे, इंदुबाई सपकाळे ,रजनी तळेले ,यशवंत वारके ,विश्वनाथ वाणी, छबुताई झांबरे ,पाटील ,अरुण धांडे आदी सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश जंगले यांनी केले.कार्यक्रम यशस्वीसाठी प्रकाश पाटील,संजय चौधरी,प्रभाकर झांबरे, अशोक नेहेते,धनराज पाटील, भास्कर खाचणे,भानुदास पाटील, सुनील सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.

विश्व कल्याण साधनारी प्रार्थना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button