JBCL Season-3 वर IT DigiTech Solutionsचा दिमाखदार विजय!


JBCL Season-3 वर IT DigiTech Solutionsचा दिमाखदार विजय!
अंतिम सामन्यात शानदार कामगिरी; विजेत्या संघाला ₹25,555 रोख आणि इलेक्ट्रिक स्कूटीचे बक्षीस
जळगाव : जळगाव बॉक्स क्रिकेट लीग (JBCL) Season-3 चा अंतिम सामना अत्यंत उत्साहपूर्ण आणि रोमांचक वातावरणात पार पडला. या स्पर्धेत IT DigiTech Solutions संघाने दमदार सांघिक कामगिरी करत अंतिम सामन्यात विजय मिळवून JBCL Season-3 चे विजेतेपद पटकावले.
IT DigiTech Solutions संघाचे मालक अक्षय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार मिहिर अडवाणी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यातही खेळाडूंनी शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
विजेत्यांवर बक्षिसांची बरसात
JBCL Season-3 मध्ये विजेत्या संघांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या IT DigiTech Solutions संघाला ₹25,555 रोख रक्कम आणि इलेक्ट्रिक स्कूटी देऊन गौरविण्यात आले.
उपविजेत्या ZACC भुसावळ संघाला ₹15,555 रोख रक्कम आणि टीव्ही, तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या Royal Mobile संघाला ₹7,555 रोख रक्कम आणि सायकल देऊन सन्मानित करण्यात आले.
ZACC भुसावळ उपविजेता; Royal Mobile तृतीय
स्पर्धेत ZACC भुसावळ संघाने उपविजेतेपद मिळवले. संघाचे मालक एम. डी. झाहिद असून मयूर कोळी यांनी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व केले.
तर Royal Mobile संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या संघाचे मालक शिबान बागवान असून कर्णधार आयुष मदानी यांनी संघाला उत्कृष्ट नेतृत्व दिले.
मयूर कोळी मालिका वीर
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये ZACC भुसावळच्या मयूर कोळी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल मालिका वीर (Man of the Series) पुरस्काराने गौरविण्यात आले.
शाहरुख पटेल यांनी सर्वोत्कृष्ट फलंदाज, लक्ष विश्राणी यांनी सर्वोत्कृष्ट गोलंदाज, तर साहिल पाटील यांनी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार पटकावला.
क्रिकेटप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्पर्धेला रंगत
JBCL Season-3 च्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्पॉन्सर्स, संघमालक, खेळाडू, कर्णधार, आयोजक तसेच उपस्थित मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले. अंतिम सामन्यावेळी सर्व संघांचे मालक, स्पॉन्सर्स आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेळाडूंनी दाखवलेला उत्साह, उत्कृष्ट क्रीडाभावना आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे JBCL Season-3 स्पर्धेला विशेष रंगत आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे JBCL परिवारातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.







