आदिशक्ती एकवीरा मातेच्या चरणी करण पाटील नतमस्तक
महा पोलीस न्यूज | २२ एप्रिल २०२४ | जळगाव तालुक्यातील आमोदा बु.च्या ग्रामदैवत आदिशक्ती एकविरा मातेचा यात्रोत्सवाला सुरूवात झाली असून सोमवारी (दि.२२) महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील, खासदार उन्मेष पाटील यांनी यात्रोत्सवात सहभागी होवून आई एकविरा मातेचे दर्शन घेतले व विजयासाठी साकडे घातले.
पहाटे ४ वाजता गावातून काढण्यात आलेल्या मातेच्या पालखी मिरवणुकीत देखील करणदादा पाटील, खासदार उन्मेष पाटील यांनी सहभागी होत ठेका धरला. पालखी आदिशक्ती एकविरा मातेच्या मंदिरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी करण पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव तालुका उपसंघटक शरद पाटील, सरपंच विजय सुर्यवंशी, उपसरपंच सुनंदा सुर्यवंशी, माजी सरपंच विकास सुर्यवंशी, बंडू सुर्यवंशी, छगन सुर्यवंशी, मनोहर पाटील (जामोद), मंदिराचे पुजारी गोपाल जोशी, धनंजय जोशी, मोहन जोशी, सेवेकरी रमेश सुर्यवंशी, जामोद सरपंच सतीलाला पाटील, कांतीलाल सुर्यवंशी, विजय सुर्यवंशी, महेंद्र सोनवणे, उमेश सोनवणे, बाळू आहिरे यांसह आई एकविरा मित्र मंडळ, आई एकविरा भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, वा. जे. ग्रुप, श्री स्वामी समर्थ ग्रुप, जय गुरूदेव परिवार, एकलव्य ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.