विद्यापीठात ‘करिअर समुपदेशन व व्यावसायिक कौशल्य’ कार्यशाळा

महा पोलीस न्यूज । दि.२६ जुलै २०२५ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाच्या वतीने पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी करीअर समुपदेशन व व्यावसायिक कौशल्य या विषयावर कार्यशाळा दिनांक २५ जुलै रोजी विद्यापीठात आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत चित्रकार सचिन मुसळे, प्रा. एस.आर. चौधरी, सायकलिस्ट स्वप्निल मराठे, कामिनी धांडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संचालक प्रा.आशुतोष पाटील यांनी केले.
चित्रकार सचिन मुसळे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, छंदातून आपण करीअर घडवू शकतो. त्या करीता सराव व मेहनतीची तयारी विद्यार्थ्यांनी घ्यावी. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सायकलिस्ट स्वप्निल मराठे आर्यनमन व कामिनी धांडे यांनी सायकलीचा वापर आपल्या दैनंदिन कामाकरीता करावा, त्यामुळे शरीर सदृढ राहण्यासाठी मदत होते. यामध्ये प्राविण्य मिळविल्यास करीअर घडू शकते असे सांगितले. पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य सोना कुमार यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त व अभ्यास याकडे नियमित लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पवार, प्रिती सोज्वल यांनी तर आभार पुजा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिनाक्षी पाटील, विद्या हिवराळे, योगेश राठोड, प्रतिभा पाटील, सिमा पाटील, समाधान अहिरे व लता सोनवणे यांनी प्रयत्न केले.