Education

खिर्डीच्या शिक्षकाचा स्तुत्य उपक्रम, पाठ शिकवताना पटवले पर्यावरणाचे महत्त्व

महा पोलीस न्यूज | १ मार्च २०२४ | विद्यार्थी जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याला प्लॅस्टीकचा वापर न करता कागदी किंवा कापडी पिशवीचा वापर करणे शिकवणे हे महत्वाचे आहे. खिर्डी बु. येथील अ.भा.पाटील माध्यमिक विद्यालय व ह.ल.पाटील ज्यु.कॉलेजचे शिक्षक प्रवीण धुंदले यांनी पुढाकार घेत इयत्ता सहावीच्या हिंदी विषयात असलेल्या ‘कागज की थैली’ या धड्यावरून अभिनव उपक्रम राबविला. पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना कापडी, कागदी थैली तयार करणे शिकवले.

सध्या बाजारात किंवा इतर ठिकाणी प्लॅस्टीक पिशव्यांचा सर्रास वापर होतांना आपल्याला दिसतो. काही लोक तर बाजारात गेल्यावर व्यापारी किंवा विक्रेत्याला प्लॅस्टीक पिशवीचाच आग्रह करतात. प्लॅस्टीक पिशव्या किती घातक आहे हे आपल्याला माहीती असून सुद्धा त्यांचा सर्रास वापर आपण करतो परंतु त्याचे दुष्परिणामही तितकेच घातक ठरतात. प्लास्टिक पिशव्यांपासुन प्रदुषण तर होतेच परंतु प्राण्यांनाही त्या पिशव्या तितक्याच घातक ठरतात. शासन आपल्यास्तरातून प्लॅस्टीकमुक्त अभियान राबवते पण ते कितपत यशस्वी होते किंवा हा शोधाचा भाग आहे.

विद्यार्थी जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याला प्लॅस्टीकचा वापर न करता कागदी किंवा कापडी पिशव्या वापर करणे शिकवणे हे महत्वाचे आहे. खिर्डी बु येथील अभिषेक भास्कर पाटील माध्य. विद्यालय व ह.ल.पाटील ज्यु.कॉलेजचे शिक्षक प्रवीण धुंदले यांनी पुढाकार घेतला. इयत्ता सहावीच्या हिंदी विषयात कागज की थैली हा द्वितीय सत्रातील सातवा पाठ आहे. विद्यार्थाना हा पाठ फक्त शिकवलाच नाही तर प्रत्यक्षात कागदी आणि कापडी पिशव्या तयार करून घेतल्या. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला हा उपक्रम राबवायला सांगितले. विद्यार्थी वर्तमानपत्रच्या कागदी पिशव्या बनवून ते बाजारात त्याचा वापर करत आहे, त्यामुळे प्लॅस्टीकमुक्त अभियान यशस्वी झाले.

अगोदर देखील शिक्षक प्रवीण धुंदले यांनी बचत पाठवर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना पाणी, पैसे, वह्याच्या पानांची बचत हे उपक्रम राबविले होते. धुंडले यांच्या कार्याची दखल घेतल्याने दिल्ली येथे आदर्श शिक्षण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका किर्ती महाजन पर्यावेक्षक पी.पी.देहाडे सर्व शिक्षक शिक्षिका यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button