कुऱ्हा (ता. मुक्ताईनगर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड कक्षाची दुरुस्ती पाहणी

कुऱ्हा (ता. मुक्ताईनगर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या ६ खाटांच्या फिल्ड हॉस्पिटलच्या कक्षाची दुरवस्था झालेली दिसून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले होते.
करनवाल यांनी २० ऑगस्ट, बुधवार रोजी मुक्ताईनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या वेळी कोविड कक्षाच्या छताची झालेली दुरवस्था त्यांच्या निदर्शनास आली. तत्काळ कारवाई करत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांना आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यानुसार आरोग्य विभाग व संबंधित कंत्राटदार यांनी तातडीने काम हाती घेऊन कोविड कक्षाची आवश्यक दुरुस्ती पूर्ण केली आहे.
हा उपक्रम आरोग्य सेवेसाठी उपलब्ध सुविधा दर्जेदार व कार्यक्षम ठेवण्याच्या जिल्हा परिषदेच्या कटिबद्धतेचे द्योतक आहे. नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पायाभूत सुविधा सक्षम ठेवण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर असल्याचे यामधून स्पष्ट होते






