“उजाड कुसुंबा नाही” ‘उज्वल कुसुंबा’

जळगाव – कुसूबा येथे मा.पालकमंत्री महोदय श्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत तहसील कार्यालय जळगाव अंतर्गत येणाऱ्या कुसुंबा गावातील उजाड कुसुंबा येथेमा. उपविभागीय अधिकारी जळगाव विनय गोसावी सर,मा. तहसीलदार सो जळगाव , मा.महसूल नायब तहसीलदार सो जळगाव यांचे अथक परिश्रमाने स्वातंत्र्यदिनी उजाड कुसुंबा येथे रेशनिंग कार्ड ,इतर प्रमाणपत्र वाटप नंतर लाभार्थी यांच्या चेहऱ्यावरील आनंद अद्वितीय होता. समाजाच्या तळागाळातील लाभार्थी यांच्यापर्यंत लाभ पोहचविल्याने ग्रामस्थ यांनी प्रशासनाचे आभार मानले.सदर शिबिरात एकूण 30 लाभार्थी यांना रेशनिंग कार्ड चे वाटप करण्यात आले.उत्पन्न दाखले तसेच 12 संगायो पात्र लाभार्थी यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तसेच जात प्रमाणपत्र कामी एकूण 80 लाभार्थी यांचे फॉर्म भरून घेण्यात आले .सदर शिबिरास मा.महसूल नायब तहसीलदार श्री राहुल वाघ ,मंडळ अधिकारी शिरसोली प्र बो सारिका दुरगुडे ,ग्राम महसूल अधिकारी कुसुंबा श्री चंद्रकांत ठाणगे , शिरसोली प्र न श्री मयूर महाले,शिरसोली pr बो श्री भावेश रोहिमारे,कंडारी निधी मानेकर, चिंचोली प्रतीक्षा नवले, धानवड सुप्रिया डोंगरे महसुल सेवक गणेश घुगे ,तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच उजाड कुसुंबा येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






