बांबरुड बुद्रुक ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंचपदी एस.डी. खेडकर यांची निवड

बांबरुड बुद्रुक ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंचपदी एस.डी. खेडकर यांची निवड
भडगाव -प्रतिनिधी बांबरुड बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच विषेश सभा उप सरपंच एस.डी.खेडकर आण्णा यांच्याअध्येक्षते खाली घेण्यात आली ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सौ अनिता दीपक पाटीलयांनी आपल्या वैयक्तिक खाजगी कामासाठी रजेवर गेल्याने सरपंच पदाची रिक्त असलेल्या जागी प्रभारी सरपंच पदाचा पदभार उपसरपंच एस.डी. खेडकर अण्णा यांच्याकडे देण्यात आला. प्रभारी सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्याने त्यांचे विविध क्षेत्रातून मान्यवरांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केल आहे या निवड प्रसंगी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पाटील, दीपक कृष्णा कोळी,रवींद्र भिल्ल, सौं ज्योती शिवाजी पाटील, सौं.कल्पना अनिल पाटील, सौ. शितल सुभाष महाजन, सौ. चंद्रकला भरत भिल्ल ग्रामपंचायत अधिकारी आर.बी.पाटील, यांच्या सह बाळासाहेब पाटील,ग्रापं कर्मचारी साहेबराव जाधव,सुभाष महाजन, उमेश भिल, ग्रामरोजगार सेवक योगेश बाविस्कर या प्रसंगी उपस्थित होते सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






