Crime

जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरून परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या चोरट्याला अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई ; चार मोटरसायकली जप्त

जळगाव (प्रतिनिधी) ;-जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटरसायकली चोरून त्यांची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक लाख तीस हजार रुपयांच्या चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहे

. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल ही पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील गोपाल तेली वय 42 हा वापरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्याची विचारपूस केली असता त्याने व त्याच्या साथीदाराने जळगाव जिल्ह्यातून मोटरसायकली चोरल्याचे कबूल केले. यात जळगाव शहर पोलीस स्टेशन, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशन, आणि चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील चार मोटरसायकली चोरल्याचे गुन्हे दाखला आहेत.

आरोपी गोपाल तेली याला पुढील कार्यवाहीसाठी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन देशमुख ,विनोद पाटील ,विष्णू बिराडे ,ईश्वर पाटील ,राहुल महाजन यांच्या पथकाने केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button