फिरायला गेलेल्या तरुणांवर मधमाशांचा हल्ला ; तरुणाचा मृत्यू

फिरायला गेलेल्या तरुणांवर मधमाशांचा हल्ला ; तरुणाचा मृत्यू
एक गंभीर जखमी ; सुकळी शिवारातील घटना
मुक्ताईनगर प्रतिनिधी फिरायला गेलेल्या तरुणांच्या गटावर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने एका तरुणाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची धक्कदायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी शिवारात सोमवारी ८ डिसेंबर दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी गावातील सहा ते सात तरुण सुकळी शिवारात फिरायला गेले होते. शिवारात थोड्या अंतरावर गेले असता अचानक मधमाशांचा कळपाने अचानक हल्ला चढवून या हल्ल्यात रवींद्र राठोड (वय २९) आणि योगेश पाटील (वय ४०) हे दोघे गंभीर जखमी झाले.
त्यांना तत्काळ त्यांना मुक्ताईनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मधमाशांच्या दंशामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रवींद्र राठोड याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. तर दुसऱ्या जखमी योगेश पाटील यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे .अकस्मात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सुकळी परिसरात शोककळा पसरली आहे.






