बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार : चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) :-बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकली ठार झाल्याची घटना तालुक्यातील रांजणगाव शिवारात दोन जानेवारी रोजी घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घबराटीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील रांजणगाव शिवारामध्ये पुष्कर चव्हाण यांचे शेत असून त्यांच्या शेतातील लिंबाच्या बागेची राखण करण्यासाठी कांज्या मांजरा पावरा हा गेला पाच महिना पासून पत्नी आणि मुलांसह राहायला आहे. गुरुवार दोन जानेवारी रोजी शेतात काम करीत असताना त्यांची मुलगी रसेला बाजूलाच खेळत असताना एका बिबट्याने तिच्यावर गरम घालून तिच्यावर हल्ला केल्याची घटना. घडली. यानंतर कांजा पावरा त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या चिमुकलेला तात्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याबाबत पोलीस स्टेशन आणि वनविभागात नोंद करण्यात आली आहे.
रांजणगाव शिवारात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून अनेक वेळा तो नागरिकांच्या नजरेस पडला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे