कर्ज घेताना व खरेदी करतांना नागरिकांनी जागरूक राहावे – प्रा.सुरेश कोळी
भडगाव – प्रतिनिधी ग्राहक हा आर्थिक व्यवहारा मध्ये महत्वाचा घटक आहे. कोणतेही व्यवहार करतांना अमिषाला बळी पडू नका. आज बाजारात गरजू लोकांच्या अडाणी पणाचं गैरफायदा लबाड लोक घेत असतात, बँक,विमा फायनान्स कंपन्या च्या नावाने ग्राहकांना फोन करून कर्ज साठी काही पैशाची मागणी करून लुबाडणूक करतात तसेच ऑनलाईन पार्सल आले असून त्यासाठी ” apk, anydesk ” डाउनलोड करायला लावतात व 5 रुपये चार्ज पाठवा असे सांगून फसवणूक करतात हे अँप म्हणजे आपली सर्व मोबाईल मधील माहिती, फोटो,बँक बॅलन्स पिनकोड त्यांना समजतात आपल्याला बोलण्यात ठेऊन आपल्या बँकेतून पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून घेतात तरी सर्व ग्राहकांनी व्यवहार करतांना जागरूक राहा ” असे मार्गदर्शन पर विचार अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रा. सुरेश कोळी यांनी मांडले,ते व्हारचुवल हेरिंग व डिजिटल ग्राहक या विषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले तहसील कार्यालय आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे होते यावेळी नायब तहसीलदार संजय गांधी योजना रमेश देवकर, निलेश बडगुजर, पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर अमृतकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर अमृतकर यांनी तर आभार प्रदर्शन चेतन पाटील यांनी केले