Crime

स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची करवाई चोरीच्या तीन मोटर सायकली जप्त

जळगांव : स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी जामनेर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील २ मोटर सायकल तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशन येथील १ मोटर सायकल असे चोरीची एकूण ३ मोटर सायकल स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे आरोपी नामे १)अनुराग लक्ष्मण सूनगत वय १९ रा. वाकी रोड,हरी ॐ नगर,जामनेर २)दर्शन बाप्पू चव्हाण वय १८ रा.संत सेवालाल नगर, जामनेर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी या ३ मोटर सायकल त्यांचा एक साथीदार यांच्या मार्फतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

तपासदरम्यान आरोपी कडून खालील चोरीस गेलेल्या ३ मोटार सायकल जप्त करण्यात आले आहे,जामनेर पोलिस स्टेशन येथे दाखल १)गुन्हा रजि नंबर १८/२०२६ BNS 303(2)

२)गुन्हा रजि नंबर ३८/२०२६ BNS 303(2).असे २ मोटर सायकल तसेच १)भुसावळ शहर पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर १७७/२०२४ BNS 303(2) असा

मुद्देमाल आरोपी यांच्याकडून जप्त करण्यात आला असून आरोपी सह चोरीच्या ३ मोटार सायकल असा मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईकामी जामनेर पोलिस स्टेशन येथे त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

*सदरची कारवाई पोलिस अधिक्षक श्री डॉ महेश्वर रेड्डी , अप्पर पोलिस अधिक्षक श्री अशोक नखाते,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड,पोलिस उपनिरीक्षक शरद बागल,ग्रेड पोलिस उपनिरीक्षक रवी नरवाडे,पो हे कॉ गोपाळ गव्हाडे,पो हे कॉ उमाकांत पाटील,पो ना विकास सातदिवे,पो कॉ प्रशांत परदेशी,पो कॉ राहुल वानखेडे यांच्या पथकाने केली*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button