Crime

बँकेतून काढलेली दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून केली लंपास

बँकेतून काढलेली दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून केली लंपास

पाचोरा – शहरातील जे.डी.सी.सी. बँकेतून काढलेली दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून लंपास केल्याची घटना नुराणी नगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी तिघांचा सहभाग असून त्यात एक अल्पवयीन मुलगाही सामील असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यू उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी २५ ऑगस्ट रोजी दुपारी शाळेसाठी संगणक खरेदी व बांधकामासाठी लागणारा निधी म्हणून दोन लाख रुपये बँकेतून काढले. ही रक्कम त्यांनी सेवावृत्त शिक्षक शेख खलील शेख नुरा यांच्याकडे दिली. शेख नुरा यांनी पैसे आपल्या मोपेडच्या डिक्कीत ठेवून घराकडे कूच केले. घरी पोहोचल्यावर त्यांनी मोपेड कम्पाऊंडमध्ये उभी केली असता समोर रस्त्यावर एका मुलाने फिट आल्याचे नाटक केले. मदतीसाठी शेख नुरा त्याच्याकडे धावताच दोन चोरटे मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी त्यांना घरातून पाणी आणण्यास सांगितले.

दरम्यान मोपेडची चावी तशीच राहिल्याने आरोपींनी संधी साधत डिक्कीत ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड उचलली व लहान मुलासह पसार झाले. घटनेची माहिती मिळताच शेख नुरा यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिघेही आरोपी त्यात कैद झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गजानन देशमुख पुढील तपास करत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button