निवडणूक कर्मचाऱ्यांनी घेतले यंत्र हाताळणी प्रशिक्षण, दुसरा टप्पा संपन्न
महा पोलीस न्यूज | १६ एप्रिल २०२४ | रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक पूर्ण कामांचे नियोजन करण्यात आलेले असून जे.टी.महाजन इंजिनियरिंग कॉलेज न्हावी येथे कर्मचारी प्रशिक्षण घेण्यात आले होते. कर्मचारी यांना प्रात्यक्षिकद्वारे मतदान यंत्र हाताळणी करणे बाबत प्रथम प्रशिक्षण कार्यक्रम तहसील कार्यालय रावेर येथे आयोजित करण्यात आले होते. त्याचा पुढील टप्पा हा दि.१५ रोजी आयोजित करण्यात आला.
प्रशिक्षणासाठी सर्व सेक्टर अधिकारी व मास्टर ट्रेनर यांनी कर्मचारी यांना प्रत्यक्ष यंत्र हाताळणी प्रशिक्षण दिले. यामध्ये सर्व कर्मचारी यांनी मास्टर ट्रेनरचे मार्क लिस्टप्रमाणे यंत्र जोडणी, सील करणे, मोक पोल घेणे, सी.आर.सी. करून मतदान प्रक्रिया सुरू करणे इत्यादी ६ प्रकारचे कामे प्रात्यक्षिक करून दाखविले.
प्रथम प्रशिक्षणासाठी मतदान केंद्राध्यक्ष २२५ व प्रथम मतदान अधिकारी २२५ असे कर्मचारी अधिकारी बोलविले होते, त्यापैकी केंद्राध्यक्ष २० व प्रथम मतदान अधिकारी १८ गैरहजर होते. गैरहजर कर्मचारी यांनी दि.१५ रोजी होणाऱ्या प्रशिक्षण करिता उपस्थित राहणार होते. आज दि.१५ रोजी केंद्राध्यक्ष २०२ व प्रथम मतदान अधिकारी २०१ असे कर्मचारी अधिकारी बोलविले होते, त्यापैकी केंद्राध्यक्ष २३ व प्रथम मतदान अधिकारी १७ गैरहजर होते. सर्व गैरहजर कर्मचारी यांचेवर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार व तसे आदेश संबंधित आस्थापना यांना देण्यात येणार आहेत. असे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी देवयानी यादव (IAS) यांनी दिल्या आहेत.
या प्रशिक्षणासाठी तहसीलदार बंडु कापसे, तहसीलदार मोहनमाला नझीरकर, अपर मयूर कळसे नायब तहसिलदार संजय तायडे, निवडणूक नायब तहसिलदार आर.डी.पाटील यांनी उपस्थित राहून नियोजन केले. यासाठी सर्व मंडळ अधिकारी, तलाठी कर्मचारी रावेर यावल यांनी मदत केली. प्रशिक्षणाचे आयोजन सहा निवडणूक अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तसेच आज सर्व कर्मचारी यांची आढावा सभा सुद्धा घेण्यात आली.
सभेत व्हिडिओ टीम, फिरस्ती पथक, चेक पोस्टवरील कर्मचारी, व्हिडिओ विविंग टीम यांची हिशोब (लेखा) कर्मचारी यांचे उपनिरीक्षक खर्च तथा इन्कम टॅक्स ऑफिसर राकेश रंजन यांचेसह सभा घेण्यात येऊन सर्वांना आपल्या कामाबाबत जबाबदारी काय यबाबत माहिती देऊन आपले काम व्यवस्थित करावे, कोणतीही अडचण तक्रार येणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सांगितले.