जळगांव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी सी. यू. जगताप यांची नियुक्ती

जळगांव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी सी. यू. जगताप यांची नियुक्ती
जळगांव, जळगांव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी सी. यू. जगताप यांनी आज, शुक्रवार दि. २५ जुलै २०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी त्यांचे यावेळी स्वागत केले.
या पदावर कार्यरत असलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्नेहा पवार यांची धुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात बदली झाल्यानंतर सदर पद रिक्त होते. त्यांच्या जागी पालघर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. यू. जगताप यांची बदली आदेशान्वये करण्यात आली आहे.
पदभार स्वीकृतीनंतर श्री. जगताप यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला व आगामी काळात विभागाच्या कार्यक्षमता वृद्धीसाठी सक्रिय प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.