ब्रेकिंग: महाराष्ट्रात महायुतीला मिळतोय कौल!; महाविकास आघाडीचे उमेदवार पिछाडीवर!
मुंबई:- संपूर्ण राज्यात आज विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येताना दिसत असून आज 23 रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून महाराष्ट्रीयन जनतेने महायुतीला कौल दिल्याचे चित्र दिसून येत आहे. तर महाविकास आघाडीची गाडी ही पन्नास जागांवर आघाडीवर असल्याची दिसत असल्याने आणि दुसरीकडे अपक्ष उमेदवार आणि 21 जागांवर आघाडी घेतल्याची स्पष्ट होत आहे. महायुतीच्या उमेदवारांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे.
राज्यात पुन्हा महायुतीची लाट दिसत असून पहिल्या क्रमांकावर भाजप चे उमेदवार 124 जागांवर आघाडीवर असून शिंदे सेना चे उमेदवार 56 तर अजित पवार राष्ट्रवादी गट 36 जागांवर आघाडीवर तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार 57 जागांवर आघाडीवर असून यात काँग्रेस 19 शिवसेना ठाकरे गट 19 आणि शरद पवार गटाचे तेरा उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. पुन्हा एकदा फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांचे सरकार स्थापन होईल असा दावा महायुतीकडून केला जात आहे.