महाराष्ट्र रत्न सेवाकार्य पुरस्कार-२०२५ कुणाल मोरे यांना जाहीर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था, भुसावळ यांच्या वतीने समाजसेवा, सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यकर्त्यांना गौरविण्यात येत असून यावर्षीचा “महाराष्ट्र रत्न सेवाकार्य पुरस्कार २०२५” हा मानाचा सन्मान महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना, जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख कुणाल रावसाहेब मोरे यांना जाहीर करण्यात आला आहे.
संस्थेच्या माध्यमातून समाजात समानता, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सेवा आणि सहकाराची भावना जोपासण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. समाजात भेदभाव नष्ट होऊन सर्व घटक एकत्र येऊन सामाजिक उन्नतीसाठी कार्य करावे, हा संदेश या गौरव सोहळ्यातून देण्यात येणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
पोलीस विभाग, समाजिक बांधिलकी, तसेच विविध उपक्रमांमधून युवकांमध्ये शिस्त, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारीची भावना वाढविण्याचे काम कुणाल मोरे यांनी केले असून त्याची दखल अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था यांनी घेतली आहे. पुरस्कार लवकरच एका विशेष कार्यक्रमात प्रदान केला जाणार असून जिल्ह्यातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडणार आहे.
या यशाबद्दल अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष जयश्री इंगळे यांच्यासह समाजातील विविध मान्यवर आणि मित्र परिवाराने कुणाल मोरे यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






