महाराष्ट्र योगशिक्षक संघ जळगाव जिल्हा नूतन कार्यकारणी घोषीत
जिल्हाध्यक्ष सुनील गुरव, महासचिवपदी पांडुरंग सोनार तर उपाध्यक्षपदी स्वाती निकम यांची निवड
महा पोलीस न्यूज । १७ एप्रिल २०२४ | महाराष्ट्र योगशिक्षक संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी नुकतेच श्रीधरनगर येथे योगशिक्षक संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा.कृणाल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील गुरव, महासचिव पदी पांडुरंग सोनार तर उपाध्यक्षपदी ऍड. स्वाती निकम यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवड झालेल्या सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपिठावर प्रा.कृणाल महाजन, अरविंद सापकर, सुनील गुरव, सुभाष जाखेटे आदि मंडळी उपस्थित होते. महाराष्ट्र योगशिक्षक संघाची स्थापना तीन वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज नीलपवार, शरद बजाज, अर्जुन शिंदे, अशोक पाटील, चंद्रकांत अवचार, प्रसाद कुलकर्णी, राहुल येवला, सदानंद वाली, यु.के.अहिरे, विनायक बारापात्रे आणि प्रा.कृणाल महाजन या सदस्यांना घेऊन संघटन उभारण्यात आले. आज संपूर्ण महाराष्ट्रात संघाची कार्यकारणी घोषित झाली असून पाच हजाराच्यावर सदस्य संघाशी जुळलेले आहे.
कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची निवड
कोषाध्यक्षपदी नूतन जोशी, सचिवपदी सोनाली पाटील आणि रोहन चौधरी, सहसचिव म्हणून वैशाली भारंबे, संघटन सचिव डॉ.शरयू विसपुते, मीडिया प्रभारी जितेंद्र कोतवाल, सोशलमीडिया प्रभारी क्रांती गुरव, कार्यालय सचिव कविता चोपडे आणि महिला समिती प्रमुख चित्रा महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याच्या कार्यकारणीत तज्ञ मार्गदर्शकांची देखील निवड करण्यात आली आहे. यामध्ये संघाचे राज्य सदस्य प्रा.कृणाल महाजन, योगपंडित अरविंद साफकर, हेमांगिनी सोनवणे, डॉ.भावना चौधरी, ज्येष्ठ योगशिक्षक सुभाष जाखेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी पांडुरंग सोनार यांनी सूत्रसंचालन केले तर, आभार सुनील गुरव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निलेश वाघ, अर्चना गुरव, राकेश शिरसाठे, रश्मी शिरसाठे आदि मंडळींनी परिश्रम घेतले.