Crime

गिरड व मांडकी गिरणा पत्रात वाळुचा उपसा करणारी बोट जाळुन नष्ट महसुल विभागाची कार्यवाही

भडगाव- प्रतिनिधी : तालुक्यातील गिरड व मांडकी येथील गिरणा नदीपात्रातुन बोटीद्वारे व किन्ही च्या साह्याने अवैध गौनखनिज वाळु उपसा करणारी १ बोट जाळुन नष्ट केली व ४ किन्हीचे दोर जाळुन नष्ट केले आहे. ही कार्यवाही दि.३०रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. वरील कार्यवाही कामी पथक प्रमुख नायब तहसीलदार रमेश देवकर, मंडळ अधिकारी दिनेश येंडे, ग्राम महसुल अधिकारी अनिता सुतार,प्रियंका शिंदे,सुनिल मांडोळे,दिपक पाटील,प्रकाश पाटील,महसुल सेवक रामकृष्ण मनोरे,अश्विनी लिंडायत,पो.कॉ.कल्पेश अहिरे, कुंदन राजपूत,पोलीस पाटील विनोद मनोरे आदिंनी ही कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीमुळे अवैधरित्या वाळु उपसा करणार्यांमध्ये खळबळ उडाली आले. गिरड व मांडकी गिरणा नदीच्या पात्रातून मोठया प्रमाणात अवैधरित्या वाळुचा उपसा सुरु आहे. महसुल विभागाच्या या कार्यवाहीचे गिरड व मांडकी परीसरातील शेतकरी, नागरीकातुन स्वागत होत आहे. अवैधरित्या होणारा वाळुचा उपसा रोखण्यासाठी महसुल विभागामार्फत अशाच धडक कार्यवाहयांचे सत्र सुरुच ठेवावे. अशी मागणी परीसरातील नागरीकातुन होतांना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button