Other

सुजन टॉकीज परिसरातील खून प्रकरणाचा १२ तासांत उलगडा; आरोपीला अटक

सुजन टॉकीज परिसरातील खून प्रकरणाचा १२ तासांत उलगडा; आरोपीला अटक

मालेगाव – शहरातील जुना आग्रा रोडवरील सुजन टॉकीज परिसरात २५ वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. अवघ्या १२ तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या खुनाचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे.

दि. २६ जून २०२५ रोजी मालेगाव छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुजन टॉकीज परिसरातील मोकळ्या जागेत एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख अमोल मोहन निकम (वय २५, रा. एकता नगर, गवळीवाडा, मालेगाव) अशी पटली. प्रारंभीच्या तपासात अमोल निकमचा गळा भगव्या रंगाच्या रूमालाने आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याच्या तपासासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि मालेगाव कॅम्पचे उपविभागीय अधिकारी सुरज गुंजाळ यांनी विशेष तपास पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.

स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी तपासाची चक्रे फिरवत मृत अमोल निकमच्या हालचाली, दैनंदिन व्यवहार याबाबत माहिती गोळा केली. घटनेच्या दिवशी अमोल एका दुचाकीवरून गेला असल्याची माहिती समोर आली. त्याच आधारावर पुढे तपास करून, संशयित विशाल मारूती गवळी (वय ३८, रा. कैलास नगर, मालेगाव) यास ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत विशाल गवळीने अमोल निकम याच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राग मनात धरून त्याचा गळा गमछ्याने आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात हजर करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे, सुदर्शन बोडके, सपोउनि नवनाथ सानप, तसेच पोलीस अंमलदार सचिन धारणकर, गोरक्षनाथ संवत्सरकर, शरद मोगल, गिरीष निकुंभ, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, संदीप राठोड, विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button