फुले मार्केटमध्ये शॉपींगसाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र लांबविले
महा पोलीस न्यूज | १४ एप्रिल २०२४ | भुसावळ येथून जळगाव शहरातील महात्मा फुले मार्केटमध्ये शॉपिंगसाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथील फालक नगरात राहणाऱ्या ज्योती सचिन खरात वय-३० वर्ष या दि.१३ एप्रिल रोजी बहिण आणि चुलत भावासोबत सायंकाळी ५ वाजता फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या. फुले मार्केटमधून केळकर मार्केटमधील वैष्णवी दुकानातून चालत रुपकला दुकानात शॉपींगसाठी त्या गेल्या असता तेथे त्यांनी स्वतःची पर्स पाहिली असता त्याची चैन उघडलेली होती.
पर्सच्या पुढील बाजूला धारदार वस्तूने कट मारलेले दिसल्याने त्यांनी पाहिले असता त्यात ठेवलेले १ लाख ३५ हजार ५३५ रुपयांचे मणी-मंगळसुत्र कुणीतरी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.