स्वातंत्र्य दिनानिमित्त मारवड येथे रक्तदान आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन

अमळनेर|पंकज शेटे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मारवड (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया विभागाने रक्तदान आणि मोफत डोळे तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमाला नागरिक, महिला आणि तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरामध्ये माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन पाटील, युवती जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात अनेक युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. त्याचबरोबर मोफत डोळे तपासणी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन व उपचार दिले.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जळगाव जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदीप सांगोरे, विद्यार्थी अध्यक्ष कृष्णा बोरसे, ऋषिकेश बोरसे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष मयूर बोरसे, हुजेफा पठाण, प्रणव चौधरी, आदित्य पाटील, आणि फ्रेंड्स कब्बडी संघ, मारवड यांनी केले.






