Politics
जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
जळगाव:- जिल्हा प्रशासनाने रात्री उशीरा मतदानाची अचूक आकडेवारी दिली आहे. यानुसार जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील टक्केवारी खालील प्रमाणे
चोपडा : 66.57 टक्के
रावेर : 73.84 टक्के
भुसावळ : 57.75 टक्के
जळगाव शहर : 54.95 टक्के
जळगाव ग्रामीण : 69.33 टक्के
अमळनेर : 65.61 टक्के
एरंडोल : 68.86 टक्के
चाळीसगाव : 61.67 टक्के
पाचोरा : 68 : 32 टक्के
जामनेर : 70.55 टक्के
मुक्ताईनगर : 70.71 टक्के
यानुसार मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने माहिती कार्यालयाच्या माध्यमातून जारी केली आहे. आता दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत कोणता उमेदवार निवडून येतो याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.