वैश्यवाणी समाजातील गुणवंतांचा उद्या गौरव सोहळा
महा पोलीस न्यूज । ६ जुलै २०२४ । वैश्यवाणी युवा फाऊंडेशनतर्फे उद्या रविवार दि.७ जुलै रोजी वैश्यवाणी समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समारंभाला राज्यभरातील गुणवंत विद्यार्थी आणि पालक उपस्थित राहणार आहेत.
वैश्यवाणी युवा फाऊंडेशनतर्फे यंदा राज्यभरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्या दि.७ जुलै रोजी सकाळी १० वाजता ब्राह्मण समाज सभागृह बळीराम पेठ याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या यशाला बळ देत करिअरच्या पुढील वाटा सुकर होण्यासाठी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
गुणगौरव सोहळ्याची संकल्पना वैश्यवाणी युवा फाऊंडेशनचे चेतन वाणी, भुषण वाणी, राकेश वाणी यांची असून नियोजन समितीचे योगेश शेटे, पुरुषोत्तम शेटे, संजय शेटे, योगेश शेटे, राकेश शेटे, अशोक शेटे, राहुल शेटे, शशांक आहिरे, ज्ञानेश्वर शेटे, कैलास जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी, समाजबांधव परिश्रम घेत आहेत.