Politics

नशिराबादला नवीन वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील : ना.गुलाबराव पाटील

महा पोलीस न्यूज । दि.११ ऑक्टोबर २०२४ । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबादला आता पर्यंत सुमारे 183 कोटींचा निधी उपलब्ध करून नशिराबदचा सर्वांगीण व सर्वसमावेशक विकास साधला आहे. ग्रामविकासात विघ्न आणणाऱ्यांना झूगारून विकास कामे करीत राहणार. मतदार हाच माझा समाज असून विकास हेच माझे ध्येय आहे. मंत्रिपदाची गरिमा राखून काम केले. नाशिराबाद करांचे प्रेम कदापी विसरणार नसून प्रत्येक माणूस विविध समाजासाठी सामाजिक सभागृह करीता निधी देता आल्याचे आत्मिक समाधान आहे. पुढील टप्यात नशिराबादला स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रयत्नशील असून नवीन वैभव प्राप्त होई पर्यंत स्वस्थ बसणार नाही. अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. बस स्थानक चौक येथे आयोजित 57 कोटीची पाणीपुरवठा योजनेचे आणि विविध विकास कामांच्या लोकार्पण, भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

जि.प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुमारे 183 कोटींच्या मंजूर केलेल्या कामांचा पाढाच वाचून ऋण निर्देश व्यक्त केले. नशिराबादकर आपण केलेला विकास विसरणार नसून येणाऱ्या निवडणुकीत आमचे मोठे पाठबळ देणार असल्याचे सांगितले.

पालकमंत्र्यांची वचन पूर्ती – नशिराबादकरांचा जल्लोष
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी सरपंच विकास पाटील यांनी पालकमंत्र्यांनी 183 कोटी निधीतून मंजूर केलेल्या विकास कामांचा पाढाच वाचला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी वाघुर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी 57 कोटी 36 लक्ष निधीतून नगरोत्थान योजने अंतर्गत पाणीपुरवठा मंजूर प्रत्यक्षात सुरु करून नशिराबाद करांना दिलेला शब्द पाळला. विविध सामाजिक सभागृह मंजूर केल्याबद्दल तसेच वाघुर धरणावरून शहरासाठी नशिराबाद करांची तहान भागविणार आहे. तसेच त्या प्रधानमंत्री आवास योजनेत्तील टप्पा -2 मध्ये नशिराबादचा समावेश केला असल्याने प्रत्येक घरकुल धारकांना आता 2.50 लक्ष निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे पालकमंत्र्यांच्या वचन पूर्ती नगरपालिका, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतीनिधी यांनी फटाक्यांच्या आताश बाजीत, महिलांनी औक्षण करून, शाल श्रीफळ व बुके देवून जल्लोषात सत्कार केला. यावेळी सत्काराने ते भारावून गेले होते. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिवसेनेचे माजी सरपंच विकास पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र सपकाळे, शहर प्रमुख विकास धनगर, जितेंद्र महाजन, डी. डी. माळी, युवासेनेचे चेतन बऱ्हाटे, ह भ.प. सुनिल महाराज, लेवा समाजध्यक्ष प्रकाश खाचणे, जैन समाजध्यक्ष महावीर जैन, दिनेश जैन, प्रसाद महाराज धर्माधिकारी, देविदास माळी, एकनाथ नाथ, असलम खान, निळकंठ रोटे, प्रवीण पाटील, माजी उपसरपंच कीर्तीकांत चौबे, योगेश पाटील, चंद्रकांत भोळे, अनिल पाटील, किरण पाटील, बापू बोढरे, करीम कल्ले, सलीम शहा, विनायक वाणी, प्रदीप देशपांडे, भूषण कोल्हे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, रमेशआप्पा पाटील, रोहित कोगटा, जितू गवळी, राजू पाटील, उप मुख्याधिकारी तन्वीर पटेल, पाणीपुरवठा उपा अभियंता अतुल चौधरी, विजय तोषनिर, लेखापाल दौलत गुट्टे, यांच्यासह नशिराबाद परिसरातील सरपंच, ग्रा. पं. सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक, पदाधिकारी शिवसेना – भाजपा युतीचे पदाधिकारी व नागरिक न. पा चे अधिकारी व कर्मचारी, विविध समाज बांधव पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत नशिराबाद शहरासाठी वाघुर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजना – 57 कोटी 36 लक्ष, भुयारी गटार 60 कोटी, डीपीडीसीच्या नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेतून 24 कामे – 03 कोटी 62 लक्ष, नगरोत्थान अंतर्गत 14 कामे – 01 कोटी 58 लक्ष, नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 8 कामे – 90 लक्ष या कामांचे भूमिपूजन तर नगरोत्थान योजनेअंतर्गत 7 कामे – 1 कोटी 10 लक्ष तसेच अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 9 कामे – 86 लक्ष, दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत 1 काम – 15 लक्ष अशा 2 कोटींच्या कामांचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच झिपरु अण्णा महाराज समाधी मंदिर देवस्थान परिसरात विकास कामे करणे – 5 कोटी, भवानी माता मंदिर परिसरात विकास कामे करणे – 2 कोटी 50 लक्ष ही कामे प्रगतीपथावर असून शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत नशिराबाद येथे वाकी नदीवर 02 पूल व संरक्षण भिंतसह रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी 25 कोटींच्या कामांचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात न. पा. चे मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांनी पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार व विविध विकास कामांचा अहवाल सविस्तरपणे विशद करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भरघोस निधी दिल्याबादाल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक बंडू खंडारे यांनी केले तर आभार माजी सरपंच विकास पाटील यांनी मानले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button