लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी दिल्या सदिच्छा
जळगावात कांचन नगर, चौगुले प्लॉट परिसरात प्रचाराला मिळाला प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव शहर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांनी कांचन नगर, चौघुले प्लॉट परिसर या भागात सकाळी जोरदार प्रचार केला. प्रचारामध्ये अनेक नागरिक स्वतःहून सहभागी झाले होते. अनेक लाडके बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी सदिच्छा दिल्या.
आ. राजूमामा भोळे यांना प्रचारामध्ये दिवसेंदिवस लोकप्रियता मिळत आहे. बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी आमदार राजूमामा भोळे यांनी हरिओम नगर परिसरातून साईबाबा मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. यानंतर माजी नगरसेविका कांचनताई सोनवणे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. स्वामीनारायण मंदिर, वाणी मंगल कार्यालयमार्गे डॉ. व्ही. आर. तावडे यांच्या घरी आ. भोळे यांनी भेट दिली. तेथे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यानंतर उज्वल चौक परिसर, श्री स्वामी समर्थ केंद्राच्या गल्लीत लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांचे औक्षण करीत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर मयूर शिंपी यांच्या घरी जाऊन तेथील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळले. यासोबत हरिओम नगरातील श्री गुरुदत्त मंदिर आणि भगवान महादेवाचे दर्शन घेऊन पुढे कालंका माता देवस्थान येथे देवीच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.
रॅलीमध्ये लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, मंडळ क्रमांक दोनचे अध्यक्ष राहुल घोरपडे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, कांचन सोनवणे, भारतीताई सोनवणे, रंजनाताई सपकाळे, शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, निलेश तायडे, शुभम तायडे, शालिक सपकाळे,भरत सपकाळे, गणेश बाविस्कर, अजित राणे, विजय वानखेडे, प्रल्हाद सोनवण, दीपक कोळी, रवींद्र पाटील, मिलिंद सपकाळे, रेखा पाटील, जितेंद्र मराठे, गणेश सोनवणे, चित्रा मालपाणी, विद्या पाटील, वैशाली पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विकी राजपूत, तुषार इंगळे, समाधान कोळी, पप्पू चौधरी, कुणाल चौधरी, मंगला पाटील, कुणाल कोळी, ममता तडवी, लता मोरे, अर्चना कदम, जयश्री पाटील, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, नरेंद्र मोरे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे लल्लन सपकाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.