Social

जळगाव परिमंडलात ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

जळगाव – ग्राहक सुविधांसाठी महावितरणकडून सातत्याने नवतंत्रज्ञानाचा वापर केला जातोग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचावेत यासाठी ऑनलाईन वीजबिल भरणा प्रक्रियेला गती देण्यात येतेमहावितरणच्या या ऑनलाईन पध्दतीला जळगाव परिमंडलातूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहेनोव्हेंबर 2024 या महिण्यात जळगावधुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलातून उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील 5 लाख 20 हजार 459 वीज ग्राहकांनी 210 कोटी 73 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

 

          ऑनलाईन विजबिल भरणा पध्दतीमुळे ग्राहकांना रांगेत उभे राहून अधिकचा वेळ खर्ची घालवण्याची गरज नाही. ऑनलाईन वीजबिल भरणा केल्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार आहे. शिवायवीज यंत्रणेवरील वसुलीसाठीचा अतिरिक्त ताणही कमी होणार आहे.

 

ग्राहकांना वीज सेवेबाबतचे एस एम एस देण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणीही सुरु असून ग्रामीण भागातल्या वीज ग्राहकांची भाषेची सोय व्हावी म्हणून महावितरणतर्फ़े आता इंग्रजीसह मराठी भाषेतूनही एस एम एस सेवा सुरु आहेजळगांव जिल्ह्यातून नोव्हेंबर महिन्यात लाख 45 हजार ग्राहकांनी  127.56 कोटी रुपयांचा ऑनलाईन विजबिल भरणा केला. धुळे जिल्ह्यातून एक लाख 19383 ग्राहकांनी 65.13 कोटी तर नंदूरबार जिल्ह्यातून 55 हजार 877 ग्राहकांनी 18 कोटी 04 लाख रुपयांचा ऑनलाईन भरणा केला.

 

आपल्याकडे संगणकावर किंवा महावितरण मोबाईल ॲप व महापॉवरपेच्या मदतीने वीजबिल भरण्याची सोपी पध्दत उपलब्ध आहेग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचावेतरांगेत तिष्ठत उभे राहाण्याची गरज भासू नये म्हणून महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर जाऊन ग्राहकांना चालू वीजबिल भरण्याची सुविधा आहेऑनलाईन बिल भरल्यास संगणकीकृत पावती ग्राहकाला मिळतेमहावितरणचे मोबाईल ऑनलाईन ॲप्लीकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असून ती सेवा चोवीस तास उपलब्ध आहेत्यामुळे ग्राहकाला आपले वीजबिल केव्हाही आणि कुठूनही भरता येते.

 

एस एम एस सेवेसाठी वीज ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहेनोंदणीसाठी ग्राहकांनी मराठीमराठी भाषेसाठी (कॅलिटलमध्ये MLANG) टाईप करुन स्पेस देऊन आपला बारा अंकी वीजग्राहक क्रमांक टकून 9225592255 या क्रमांकावर  एस.एस.एसकरावा लागणार आहेमहावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांची माहिती तसेच त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आठवड्यातील सातही दिवस व चोवीस तास टोल फ़्री सेवा उपलब्ध करुन दिली आहे. 1912  1800233435, 18001023432 या क्रमांकावर तक्रार नोंदविता येतेअधिकाधिक ग्राहकांनी महावितरणच्या ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावाअसे आवाहन मुख्य अभियंता श्री आयमुलाणी यांनी केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button