शाखाधिकाऱ्याकडुन फसवणुक प्रकरणी निष्णाप कर्जधारकांना नाथाभाऊंचा दिलासा

शाखाधिकाऱ्याकडुन फसवणुक प्रकरणी निष्णाप कर्जधारकांना नाथाभाऊंचा दिलासा
महा पोलीस न्युज| सुभाष धाडे| जिल्ह्यातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील जळगाव जनता बँक च्या शाखाधिकारी यांनी विविध रीतीने लोकांच्या नावे कर्ज मंजुर करुन परस्पररीत्या रक्कम हडप करुन कोट्यावधीचा अपहार केलेला असुन निर्दोष कर्जधारकांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडुन नोटीसा प्राप्त होत आहे.अशातच फसवणुक झालेल्या लोकांचे सिबिल स्कोअरची स्थिती खालावली असून नेट बँकिंग क्षेत्रातील आर्थिक व्यवहार सफल होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी सदर फसवणुक प्रकरणी कर्जधारकांची मानसिकता खालावत चाललेली असुन पुढे नेमकं यातुन सुटका कशी होईल हा यक्षप्रश्न कर्जधारकांपुढे आ वाचुन उभा आहे. तसेच आपल्या नावे असलेली लाखो रुपयांची थकबाकी रक्कम यामुळे निर्दोष कर्जधारक पुरते भांबावलेल्या स्थितीत आहे.
दरम्यान या फसवणुक प्रकरणी काही कर्जधारकांनी बैकचे मुख्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार निवेदन दिलेले असल्याने पाहीजे तसा प्रतिसाद मिळत नसला तरी बँकेकडुन प्राथमिक चौकशी होऊन शाखाधिकारी बाळु धोंडु टाकरखेडे याला शाखाधिकारी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका एका लेखी पत्राद्वारे केला असल्याचे समजते तसेच सदरचे प्रकरण पोलीस अधीक्षक कार्यालयातुन आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होत बैकेच्या आॅडीटसह फाॅरेन्सिक तपास सुरु असुन संबंधितांचे जाब जबाब घेण्याचे काम पोलीस यंत्रणेकडुन सुरु आहे.तपासाअंती दोषींवर गुन्हे दाखल केले जातील अशी प्राथमिक माहीती समोर येत आहे.
दरम्यान भांबालेल्या मनस्थितीत असलेल्या निर्दोष कर्जधारकांनी माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांची फाॅर्महाऊसवर भेट घेऊन आपापल्या व्यथा मांडल्या व याबाबत आम्हाला न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी केली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी याप्रकरणी या कर्जधारकांना तुर्तास दिलासा दिलेला असुन याबाबत मार्गदर्शन दिले. यावेळी कुऱ्हा,सुकळी,घोडसगाव चिखली आदी परीसरातील कर्जधारक उपस्थित होते. माजी मंत्री यांना दिलेल्या निवेदनात बाळु चोपडे,संजय खिरडकर,चद्रभान इंगळे,गजानन गलवाडे,गणेश ढोले,कडु खिरळकर ,प्रमोद तायडे तसेच घोडसगाव चिखली परीसरातुन मनजित टाकरखेडे,बाळु कांडेलकर,शिवराम बिचारे, किशोर देशमुख,गणेश टाकरखेडे,गणेश धायडे, सुकळी परीसरातुन विनोद बेलदार, ज्ञानेश्वर धनगर,विलास कोळी,प्रमोद पाटील,सुभाष धाडे,अक्षय बावस्कर,नंदकुमार नमायते,सुनिल कोळी, आनंदा धनगर यांच्यासह इतर कर्जधारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आम्ही रुपया न घेता , आमच्या नावे कर्ज मंजुर करुन सदर रक्कम परस्पर हडप करण्यात आली.
याप्रकरणी बँकेकडुन तसेच प्रशासनाकडुन संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.अशी मागणीवजा विनंती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.