Detection

तरुणाचा खून : शेवटचा संशयित शनिपेठ पोलिसांच्या जाळ्यात, दोघांना पोलीस कोठडी

महा पोलीस न्यूज । दि.५ मे २०२५ । शहरातील अशोक नगर परिसरातील आकाश भावसार या ३० वर्षीय तरुणाचा राष्ट्रीय महामार्गावरील ए वन भरीत सेंटरजवळ शनिवारी रात्री धारदार शस्त्रांनी वार करून क्रूरपणे खून करण्यात आला. याप्रकरणातील ४ संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती. गुन्ह्यातील शेवटच्या फरार संशयिताला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना १३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अशोक नगर परिसरातील आकाश पंडित भावसार (वय ३०) याच्या खून प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एलसीबीच्या पथकाने रविवारी अजय मंगेश मोरे वय-२८, चेतन सोनार वय-२३ रा.कासमवाडी याच्यासह दोन अल्पवयीन संशयितांना अटक केली होती. तर कुणाल उर्फ सोनू चौधरी हा संशयित फरार होता. संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोघांना १३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच अल्पवयीन संशयितांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

मेहरुण परिसरातून घेतले ताब्यात
खुनाच्या गुन्ह्यात कुणाल उर्फ सोनू चौधरी वय-२२ रा.कासमवाडी हा फरार झाला होता. शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश ढिकले, पोलीस कर्मचारी अनिल कांबळे, पराग दुसाने, निलेश घुगे यांनी मेहरुण परिसरातून कुणाल चौधरी याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास शनिपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button