Crime

धक्कादायक : दिव्यांग पतीला विहिरीत ढकलत खून, संशयीत पत्नीविरुद्ध गुन्हा

महा पोलीस न्यूज | १३ जून २०२४ | शेतातील मंदिरात मुंजोबा देवाच्या पाया पडण्याच्या बहाण्याने घेऊन जात दिव्यांग पतीला विहिरीत ढकलून पत्नीनेच खून केल्याची खळबळजनक घटना दि. १२ जून रोजी धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली आहे. प्रकाश यादव धोबी (सुर्यवंशी) वय ३६ वर्ष रा. भवरखेडा ता. धरणगाव), असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन शिवाजी धोबी (रा.भवरखेडा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि.२ जून रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान, संशयित आरोपी पत्नी ज्योती प्रकाश धोबी ही पती प्रकाश धोबी यांना गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाचे मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने शेतात घेऊन गेली. पतीच्या अपंगत्वाचा फायदा घेवुन त्याला विहिरीत ढकलुन देवून मारुन टाकले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button