दोन गटात झालेल्या बेदम मारहाणीत एकाचा खून

जळगाव शहरातील राजमलती नगरातील घटना
जळगाव:-दोन गटात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या तुफान हाणामारी मध्ये एक जणांचा मृत्यू झाला असून घटनेची माहिती कळतात पोलीस अधीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
सिद्धार्थ माणिक वानखेडे वय 36 रा. राज मालती नगर असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की राजमालती नगर परिसरात आज दोन गटात 20 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान झाली. यात सिद्धार्थ माणिक वानखेडे याला आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण केल्याने या माराने त्याचा मृत्यू झाला तर विशाल अजय सुरवाडे वय,28 जानू संजू पाटील वय 21 ,महमूद हाजी बिस्मिल्ला पटेल 42 , भाईजान राजू पाटील वय 24 आदी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणातील सात ते आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.