Social

नगाव खुर्द येथे खेत बचाव अभियान; महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

नगाव खुर्द येथे खेत बचाव अभियान; महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

जलतारा कामाचे भूमिपूजन; कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जळगाव, प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील नगाव खुर्द येथे शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी खेत बचाव अभियान व महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी जलतारा कामाचे भूमिपूजनही सरपंचांच्या हस्ते करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी सी. जे. ठाकरे व मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती अमळनेरचे गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील होते.

यावेळी उपकृषी अधिकारी पी. आर. पाटील व सहाय्यक कृषी अधिकारी नवल वाघ यांनी उपस्थित शेतकरी महिला व पुरुषांना खेत बचाव अभियान, शेती संवर्धन, पीक संरक्षण तसेच महिला शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाला नगाव खुर्दच्या सरपंच सरला चंद्रकांत जगदाळे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल उमराव बोरसे व अनिल भिला बोरसे यांनी सहकार्य केले. ग्रामपंचायत अधिकारी पवनकुमार वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button