नांदेड एलसीबीची सुपर कामगिरी : स्प्लेंडर स्पेशलिस्ट टोळी जेरबंद, ६१ दुचाकी हस्तगत
महा पोलीस न्यूज | १९ मार्च २०२४ | नांदेड जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी एलसीबी निरीक्षकांना सूचना केल्या होत्या. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दुचाकी चोरट्यांच्या शोधार्थ वेगवेगळी पथके तयार करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे सुरू केले होते. पथकाने स्प्लेंडर स्पेशलिस्ट चोरांची टोळी जेरबंद केली आहे. टोळीकडून ५१ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले असून २१ लाख ४७ हजारांच्या ६१ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, किनवट येथील काही इसमाकडे चोरीच्या मोटार सायकल आहेत. माहितीवरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार व सचिन सोनवणे यांच्या दोन पथकांना किनवट येथे रवाना केले. स्थागुशाचे पथकांनी मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी जावुन गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीनुसार बालाजी आभिमान माने वय २७ वर्षे रा.भावेश्वरनगर चौफाळा, नांदेड ता. जि. नांदेड ह. मु. सिध्दार्थनगर गोकुंदा, ता. किनवट जि. नांदेड, दिपक सुरेश कोकुर्ले वय २३ वर्ष रा. शनिवारपेठ, किनवट, विकास शेषेराव शिंदे वय २३ वर्ष रा. प्रधान सांगवी ता.किनवट जि.नांदेड, रमेश श्यामराव कयापाक वय ३८ वर्ष रा. तरोडा खुर्द बेलानगर, नांदेड ह. मु. कोठारी ता.किनवट, राजु दादाराव भगत वय २४ वर्ष रा.कोठारी ता.किनवट, शफी फकरोद्यीन सय्यद वय २३ वर्ष रा. कोठारी ता किनवट यांना ताब्यात घेतले होते.
पथकाने सर्वांना गुन्ह्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी मोटार सायकल चोरी केल्याचे सांगीतले. त्यांचेकडुन तब्बल ६१ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या असून त्यामध्ये नांदेड जिल्हयातील एकूण ५१ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. उर्वरीत १० मोटार सायकल चोरीचे गुन्हयाबाबत शहानिशा करुन संबंधीत पोलीस ठाण्यास देण्यात येत आहे. आरोपीकडुन इतर आरोपी व गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आरोपींकडुन चोरीची मोटार सायकल खरेदी करणाऱ्या इसमांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे. ताब्यातील आरोपीना पुढील तपासकामी संबंधीत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. नांदेड पोलीस अधीक्षक यांनी, जिल्हयातील जनतेस आपले मोटारसायकल पार्किंग करताना आवश्यक ती काळजी घेण्याबाबत व कमी किंमतीत कोणी चोरीची मोटार सायकल विक्री करीत असल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, दत्तात्रय काळे, गंगाप्रसाद दळवी, पोलीस अमंलदार माधव केंद्रे, गुंडेराव करले, सुरेश घुगे, संजीव जिंकलवाड, देवा चव्हाण, बालाजी यादगीरवाड, गजानन बयनवाड, मोतीराम पवार, तानाजी येळगे, मारोती मोरे, महेश बडगु, रणधीर राजबन्सी, धम्मा जाधव, हेमंत बिचकेवार, गंगाधर घुगे, हनुमानसिंह ठाकुर स्थागुशा नांदेड व सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, रेश्मा पठाण, व्यंकटेश सांगळे यांच्या पथकांनी पार पाडली आहे.