अमळनेरात आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भव्य अल्पसंख्याक मेळावा

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अमळनेर शहरात आज, शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी भव्य अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दुपारी साडेतीन वाजता पार पडणार असून, माजी मंत्री आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या मेळाव्याला अल्पसंख्याक समाजातील नामांकित नेते आ. सना मलिक, माजी आमदार जिशान बाबा सिद्दीकी, माजी आमदार फारूक शाह, युवा नेते नजीब मुल्ला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. नाझेर काझी हे विशेष उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह विविध पदाधिकारी आणि स्थानिक नेते मंडळींची उपस्थिती अपेक्षित आहे. शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांसाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी या मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले असून, सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष अलीम मुजावर आणि शहराध्यक्ष कलीमोद्दीन एल. शेख यांनी केले आहे.






