भर दुपारी गिरणा पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर महसूल विभागाच्या ताब्यात

भर दुपारी गिरणा पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर महसूल विभागाच्या ताब्यात
अवैध वाळूचे डंपर खेडगाव येथून तहसील कार्यालयात जमा
भडगाव प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे भर दुपारी एक अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर महसूल व पोलिस यांनी पकडला हा डंपर चाळीसगांव येथील असून डुबलीकेट पावतीच्या आधारावर हा भर दुपारी अवैध वाहतूक करताना आढळला हा डंपर तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आलेला आहे. भडगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू सरा सुरू असून डुबलीकेट पावत्या तयार करून महसूल व पोलिसांच्या डोळ्याने देखत भर दुपारी अवैधवारतूक सुरू आहे याबाबत कार पोलीस व महसूल प्रशासनाच्या लक्षात येताच खेडगाव येथून एक ट्रक थांबवला तो तहसील कार्यालयाला जमा करण्यात आला त्यावरील ड्रायव्हरने सांगितले की आमच्याकडे पावती आहे परंतु ती पावती तहसील कार्यालयात मिस मॅच होत होती त्यामुळे या डंपर वर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच डुबलीकेट पावत्यांचे आधारे चालणारे अवैध वाळू वाहतुकीचे डम्परांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत आहे. ही कारवाई खेडगांव खुर्द येथून पथकातील ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे, प्रशांत कुंभारे, निखिल बावस्कर, प्रसाद दुदुस्कर ,कोतवाल समाधान माळी, पो.काँ प्रविण परदेशी यांनी केली आहे.