पोलीस मित्र संघटनेतर्फे निलेश अजमेरा यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती!

महा पोलीस न्यूज । दि.२१ फेब्रुवारी २०२५ । पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली, भारत या संस्थेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निलेश प्रकाश अजमेरा यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील यांनी ही नियुक्ती केली. निलेश अजमेरा यांची नियुक्ती २०२६ पर्यंत असेल.
संघटनेने विश्वास व्यक्त केला आहे की, निलेश अजमेरा आपल्या पदाचा उपयोग पोलीस आणि नागरिकांच्या मदतीसाठी करतील आणि संघटनेची प्रतिमा अधिक उज्वल करतील. तसेच, ते जळगाव जिल्ह्यात संघटनेच्या कार्याचा विस्तार करतील. या नियुक्तीबद्दल बोलताना सुनील पाटील म्हणाले, निलेश अजमेरा यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा संघटनेला निश्चितच फायदा होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात पोलीस मित्र संघटनेचे कार्य अधिक प्रभावी होईल, असा मला विश्वास आहे.”
संतोष चौधरी यांनी निलेश अजमेरा यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मार्गदर्शन केले.