Education
६३२ विद्यार्थ्यांनी दिली पेट परीक्षा

जळगाव (प्रतिनीधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रवेश पुर्व परीक्षेच्या (पेट) शुक्रवार दि. ३ जानेवारी रोजी ६३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा केंद्रात दि. २ जानेवारी पासून पेट परीक्षा सुरु झाली आहे. दि. ३ जानेवारी रोजी विज्ञान व तंत्रज्ञान आणि मानव्य विज्ञान विद्याशाखेतील काही विषयांच्या चार सत्रात परीक्षा झाल्या. ८०१ विद्यार्थ्यांपैकी ६३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली १६९ विद्यार्थी अनुपस्थित होते. मुख्य समन्वयक म्हणून प्रा. मनोज पाटील, समन्वयक म्हणून प्रा. सुरेंद्र कापसे, केंद्र प्रमुख म्हणून प्रा. के.एफ. पवार तसेच तांत्रिक अधिकारी म्हणून दाऊदी हुसेन काम पाहत आहेत. संशोधन विभागातील अधिकारी व कर्मचारी हे परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.