कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सन २०२४ चे पुरस्कार जाहीर
चोपडा व नंदुरबार येथील महाविद्यालयांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सन २०२४ चे पुरस्कार जाहीर
चोपडा व नंदुरबार येथील महाविद्यालयांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
जळगाव, ६ ऑगस्ट (प्रतिनिधी) :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दिले जाणारे सन २०२४ चे उत्कृष्ट महाविद्यालये / परिसंस्था / प्राचार्य / शिक्षक / ग्रंथपाल / शारिरीक शिक्षण संचालक आणि उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार जाहीर झाले असून व्यावसायिक महाविद्यालये / परिसंस्था गटात चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व नंदुरबार तालुका विधायक समितीचे गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार अव्यावसायिक महाविद्यालय गटात उत्कृष्ट महाविद्यालय ठरले आहे. हे पुरस्कार बुधवार दि. ६ ऑगस्ट रोजी विद्यापीठाने जाहीर केले.
उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व संशोधक पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे
उत्कृष्ट महाविद्यालय / परिसंस्था – १) महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, चोपडा (व्यावसायिक), २) नंदुरबार तालुका विधायक समितीचे गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार (अव्यावसायिक), उत्कृष्ट प्राचार्य – प्राचार्य डॉ. सुनील पवार (पुज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा), उत्कृष्ट शिक्षक (महाविद्यालय) – १) डॉ. शशिकांत वग्गे (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव) २) डॉ. ज्ञानेश्वर सुर्यवंशी (विद्यावर्धिनी सभेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे), उत्कृष्ट शिक्षक (विद्यापीठ) १) प्रा. सतीष कोल्हे (संगणक शास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव), २) प्रा. प्रवीण पुराणिक (जैवशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव), उत्कृष्ट अधिकारी (विद्यापीठ वर्ग -१ ) – नवलसिंग पाटील (उपकुलसचिव, प्रशासन विभाग), उत्कृष्ट अधिकारी (विद्यापीठ वर्ग –२) – शरद पाटील (सामान्य प्रशासन / रा.से.यो. विभाग), उत्कृष्ट कर्मचारी (विद्यापीठ वर्ग -३) – १) भरत उफाडे (वरिष्ठ सहायक, गणितशास्त्र प्रशाळा), २) गिरीष पाटील (वरिष्ठ सहायक,वित्त विभाग), ३) संजू पाटील (सहायक, सामान्य प्रशासन विभाग), ४) जगदीश शिवदे (लघु लेखक (नि.श्रे.), रा.से.यो. व क्रीडा विभाग), उत्तेजनार्थ : ५) रवींद्र सोनवणे (डाटा एन्ट्री ऑपरेटर, संगणक केंद्र, परीक्षा विभाग), ६) अरवींद पाटील (वाहनचालक, सामान्य प्रशासन विभाग) उत्कृष्ट कर्मचारी (विद्यापीठ वर्ग -४) १) श्रीमती सविता पगारे (शिपाई, प्र-कुलगुरू कार्यालय), २) दिलीप कोचुरे (प्रयोगशाळा परिचर, बांधकाम), उत्तेजनार्थ : ३) श्रीमती प्रतिभा पवार (कुशल परिचर, संगणक शास्त्र प्रशाळा), ४) चंद्रकांत पाटील (कुशल परिचर, सामान्य प्रशासन विभाग), दैनिक वेतनिक विद्यापीठ उत्तेजनार्थ :१)दिनेश वाघ (अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष), २) नाना संदानशिव (पाणी पुरवठा विभाग), ३) निलेश सोनवणे (अतिथीगृह विभाग), संलग्नित महाविद्यालय / परिसंस्था उत्कृष्ट अधिकारी (महाविद्यालय वर्ग -२) –जितेश जाधव (रजिस्ट्रार, आर. सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), उत्कृष्ट कर्मचारी (महाविद्यालय वर्ग -३) -१) दिनेश पाटील (सहायक ग्रंथपाल, महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे दादासाहेब सुरेश पाटील महाविद्यालय, चोपडा), २) हेमंत गायकवाड (प्रयोगशाळा सहायक, बी.पी. आर्टस, एस.एम.ए. सायन्स व के.के.सी. कॉमर्स महाविद्यालय, चाळीसगाव), ३) सौ. सोनल शहा (लिपीक, एच.आर. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ४) जितेंद्र चौधरी (वरीष्ठ लिपीक, संत जगनाडे महाराज शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य वरीष्ठ महाविद्यालय, खापर), उत्कृष्ट कर्मचारी (महाविद्यालय वर्ग -४) – १) कृष्णा गवळी (शिपाई, के.सी.ई.संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च जळगाव),२) मच्छिंद्र जाधव (प्रयोगशाळा परिचर, पाचोरा ता.को.ऑ.संस्थेचे शेठ मुरलीधरजी मानसिंगका कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा), ३) गणेश गोसावी (शिपाई, एच.आर. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर) , ४) कैलास सोलंकी (प्रयोगशाळा परिचर, सातपुडा शि.प्र.मंडळाचे वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा)
विद्यापीठ शिक्षकांसाठी संशोधन पुरस्कार (प्रकाशन) : १) प्रा. जितेंद्र नाईक (रासायनिक तंत्रज्ञान संस्था), २) डॉ. वंदना शिंदे (भौतिकशास्त्र प्रशाळा (कंत्राटी शिक्षिका)) ३) डॉ. विकास पाटील (रासायनिक तंत्रज्ञान संस्था), ४) डॉ. संजय घोष (भौतिकशास्त्र प्रशाळा) ५) प्रा. श्रीमती आर.एस. बेंद्रे, (रसायनशास्त्र प्रशाळा), ६)प्रा. एस.एन पाटील (पर्यावरणशास्त्र प्रशाळा),
महाविद्यालयीन शिक्षकांसाठी संशोधन पुरस्कार (प्रकाशन ) – १) डॉ. शैलेश चालिकवार (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), २) डॉ. प्रकाश लभाणे (महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा), ३) डॉ. गणेश पाटील (एच.आर. पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ४) डॉ. गुणवंत सोनवणे (किसान विद्या प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पारोळा) ५) डॉ. कैलास मोरावकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ६) डॉ. पंकज जैन (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर) ७) डॉ. हारूण पटेल (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ८) डॉ. विनोदकुमार उगले (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ९) डॉ. उज्वलदीप देवरे (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), १०) डॉ. हितेंद्र महाजन (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ११) डॉ. अतुल शिरखेडकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), १२) डॉ. मोहन कळसकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), १३) डॉ. प्रवीण पाटील (एच.आर. पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर),
संशोधन (स्वामित्वहक्क) पुरस्कार –१) डॉ. सौरभ गणोरकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर), २) डॉ. शैलेश चालिकवार (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ३) डॉ. कैलास मोरावकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर)
संशोधन (निधी) पुरस्कार : १) डॉ. राहुल कुलकर्णी ( बी.पी. आर्टस, एस.एम.ए. सायन्स व के.के.सी. कॉमर्स महाविद्यालय, चाळीसगाव) २) डॉ. हारूण पटेल (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ३) डॉ. राहुल ताडे (एच.आर.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ४) डॉ. ज्ञानेश्वर सुर्यवंशी (विद्यावर्धिनी सभेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे)
उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार : डॉ. तुषार पाटील (एसएसव्हीपीएसचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,शिंदखेडा)
उत्कृष्ट संचालक शारीरिक शिक्षण पुरस्कार : प्रा. गोविंद मारतळे (तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर)
वरील पुरस्कार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात देण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ. विनोद पाटील यांनी दिली .