महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन उत्तर महाराष्ट्रातील ६२ पोलिसांचा गौरव
महा पोलीस न्यूज | १ मे २०२४ | महाराष्ट्र पोलीस दलात विविध प्रवर्गात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उत्तर महाराष्ट्रातील ६२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये नाशिकच्या ३५, जळगाव ११, धुळे १० तर नंदुरबार जिल्ह्यातील ६ जणांचा समावेश आहे. दरवर्षी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे काम आणि कामगिरी पाहून या पदकाने गौरविले जाते.
२०२३ या वर्षाकरिता राज्यातील ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांची घोषणा पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केली. यादीत जळगाव येथील सुपुत्र विजय चौधरी, जळगावात सेवा बजावलेले अधिकारी चंद्रकांत गवळी, कुमार चिंता यांचा देखील समावेश आहे.
पोलीस महासंचालक सन्मान मिळालेले धुळे जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी जयवंत पगारे (पोलिस निरीक्षक), संजय चिंचोलीकर, चंद्रकांत जोशी, प्रवीण खैरनार, किरण खैरनार (सहाय्यक उपनिरीक्षक, धुळे), शरसिंग परदेशी, श्रीकांत पाटील, आरीफ उस्मान शेख, प्रभाकर बैसाणे, कैलास जोहरे (हवालदार) हे आहेत.
पोलीस महासंचालक सन्मान मिळालेले नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी किरणकुमार खेडकर (पोलिस निरीक्षक), नरेश गुरव, भीमसिंग ठाकरे (हवालदार), संदीप लांडगे, मोहन ढमढेरे (पोलिस नाईक), निंबाबाई वाघमोडे (पोलिस शिपाई) हे आहेत.
पोलीस महासंचालक सन्मान मिळालेले जळगाव जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी प्रविणा जाधव (हवालदार), मोहम्मदअली सत्तारअली सय्यद, शकील अहमद शब्बीर शेख, संजय पाटील, राजेश शाहु पाटील (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक), संजय हिवरकर, मीनल साकळीकर, राजेश पाटील, दीपक चौधरी, विजय चौधरी हे आहेत.
पोलीस महासंचालक सन्मान मिळालेले नाशिक जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी चंद्रकांत गवळी (प्राचार्य, गुन्हे अन्वेषण), गीता चव्हाण (उपआयुक्त, राज्य गुन्हे), प्रकाश पवार, रघुनाथ शेगर, सत्यजित आमले (पोलिस निरीक्षक) हे आहेत.