Other

जळगावकरांच्या सेवेत मलाबार गोल्ड ॲण्ड डायमंड्स सुरू

महा पोलीस न्यूज । दि.११ ऑक्टोबर २०२४ । जगातील आघाडीच्या आभूषण विक्रेत्यांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड ॲण्ड डायमंड्सने महाराष्ट्रातील निरंतर विस्ताराच्या नियोजनाचा एक भाग म्हणून जळगाव येथे आपल्या नवीनतम शोरूमच्या भव्य उद्घाटनाची आज घोषणा केली. जळगावमधील मध्यवर्ती ठिकाणावर असलेले हे नवीन शोरूम महाराष्ट्रातील २७ वे आणि भारतातील २८१ वे विक्री दालन आहे, जी १३ देशांमध्ये ३६० हून अधिक शोरूम्सच्या मलाबारच्या वाढत्या जागतिक जाळ्यात मोलाचे योगदान देत आहेत.

प्रशस्त ५,७०० चौरस फूट क्षेत्रफळावरील हे भव्य शोरूम सोने, हिरे, पोल्की, रत्ने आणि प्लॅटिनम दागिन्यांचा विस्तृत संग्रह, शिवाय माइन डायमंड ज्वेलरी, एरा अनकट डायमंड्स, डिव्हाईन हेरिटेज ज्वेलरी यासारख्या ब्रँड्सच्या अमोघ संग्रहांतील दागिने ग्राहकांपुढे प्रस्तुत करेल. मलाबार समूहाचे अध्यक्ष एम पी अहमद यांच्या दूरचित्र माध्यमातून आभासी उपस्थितीत महाराष्ट्र राज्य शासनाचे ग्रामीण विकास, पंचायत राज आणि पर्यटनमंत्री गिरीश दत्तात्रय महाजन आणि खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते फीत कापून या नूतन शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.

या निमित्ताने आनंद व्यक्त करताना अहमद म्हणाले, “जळगावच्या या शोरूमचे अनावरण महाराष्ट्रातील आमच्या प्रगतीच्या प्रवासातील आणखी एक मैलाचा दगड आहे. विश्वास, गुणवत्ता आणि पारदर्शकता यावर लक्ष केंद्रित करून जळगावच्या लोकांना जागतिक दर्जाच्या दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही आमच्या सर्व शोरूम्सच्या ठिकाणी केल्याप्रमाणे येथील स्थानिक समुदायाच्या जीवनाचा एक प्रेमळ भाग बनण्याचा आमचे ध्येय आहे.”

तब्बल २२,००० हून अधिक बहुभाषिक व्यावसायिकांच्या जागतिक संघाद्वारे समर्थित, मलाबारकडून १०० शहरांमधील दीड कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा दिली जाते. पारदर्शकतेसाठी या ब्रॅण्डच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, मलाबारचा ‘वन इंडिया वन गोल्ड रेट’ उपक्रम सर्व भारतीय विक्री दालनांवर एकसमान किंमत सुनिश्चित करतो आणि प्रत्येक ग्राहकासाठी निष्पक्षता आणि मूल्याची हमी देतो.

जळगावमधील नूतन शोरूम देखील मलाबारच्या नामांकित आश्वासनांची पूर्तता करेल, ज्यात पारदर्शक किंमत, आजीवन मोफत देखभाल, जुन्या सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी १०० टक्के पुनर्खरेदीची (बायबॅक) हमी, प्रमाणित दर्जाचे हिरे, एचयूआयडी-अनुरूप सोने आणि ग्राहकांच्या मनःशांतीसाठी दागिन्यांचा मोफत विमा आदींचा समावेश आहे.

मलाबारच्या सामाजिक दायीत्व अर्थात सीएसआर आणि ईएसजी (पर्यावरण, सामाजिकता आणि सुशासन) उपक्रमांबद्दलच्या वचनबद्धतेनुसार, ब्रॅण्डकडून व्यावसायिक नफ्यातील ५ टक्के निधी आरोग्यसेवा, शिक्षण, गृहनिर्माण आणि पर्यावरणीय स्थिरता यासारख्या सामाजिक कारणांसाठी समर्पित केला गेला आहे. जबाबदार व्यवसाय पद्धतींचे हे समर्पण शाश्वत वाढ साध्य करताना समाजाच्या सुधारणेसाठी योगदान देण्याचे मलाबारचे दीर्घकालीन ध्येय प्रतिबिंबित करते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button