सुकळी येथे आकस्मिक मृत्यूंची मालिका कायम; पंधरा दिवसांत नऊ जणांचा मृत्यू, गावावर शोककळा

महा पोलीस न्युज | सुभाष धाडे मुक्ताईनगर | तालुक्यातील मौजे सुकळी येथे अकस्मित मृत्युची मालिका सुरुच आसुन दि ७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मयत भरत बापुराव पाटील (वय ३४) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तर त्याच दिवशी मुकेश इंगळे या ३५ वर्षीय तरुणाचा अल्प आजाराने मृत्यु झाला. एकच दिवशी तीन जणांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यु झाला. मृत्युंच्या या घटनांमुळे जनमाणसांत हळहळ व्यक्त होत आहे.
हमीद शाह इमाम शाह फकीर यांचा ह्रदयविकाचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात नेण्यापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला. दुसऱ्या घटनेत अविवाहित तरुण प्रशांत पाटील (वय २८) याचा आकस्मिक मृत्युची घटना घडली आहे.तिसरा नंबर वर वृद्ध महिला पार्वताबाई महिताफ राठोड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर किशोर बाळु पाटील या २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्देवी निधन झाले. यानंतर २५ वर्षीय तरुण वैभव पाटील याचे आकस्मित निधन झाल्याची दुर्देवी घटना घडली. या साऱ्या घटना पंचक्रोशीतील जनमाणसांचे मन हेलावून टाकणाऱ्या घटना असल्या तरी या आठवड्यात अनपेक्षितपणे घडणाऱ्या या घटनांमुळे समाजमन पुरते सुन्न होऊन सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.
अशातच दिलीप सपकाळे या व्यक्तीचा अंथरुणातच मृत्यु ओढावला. तसेच भारत बापुराव पाटील (वय ३४ ) या तरुण युवकाने लग्न जमत नसल्याने आलेल्या नैराश्येतुन राहत्या घरात गळफास घेतला. तोच व त्याच दिवशी मुकेश मुरलीधर सोनवणे या ३६ वर्षीय तरुणाचे अल्प आजाराने निधन झाले.
गावातील एकापाठोपाठ घडणाऱ्या मृत्यूंच्या या घटनांमुळे समाजमन हेलावले असुन चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. गत पंधरा दिवसांत सुकळी येथे नऊ जणांचा मृत्यु झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.






